गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (22:25 IST)

विजयादशमीच्या दिवसी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आज आपल्याला विजय मिळाला-उद्धव ठाकरें

uddhav thackeray
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.
 
विजयादशमीच्या दिवसी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आज आपल्याला विजय मिळाला आहे. न्यायदेवर जो आपला विश्वास होता. तो आज सार्थकी ठरला आहे. मी आज तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, या दसरा मेळाव्याला उत्साहात या, शिस्तीने या, या आनंदाला गालबोट लागेल असं कोणतेही कृत होऊ देऊ नका. इतर काय करतील माहिती नाही. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याची परवानगी राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी ते पाडतील, असा मला विश्वास आहे. आजच्या निकालाप्रमाणेच येत्या काही दिवसांत येणारा सर्वोच्च न्यायालयातला निकालातूनही आम्हाला न्याय मिळेल, असा मला विश्वास आहे. कारण हा निकालही देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा निकाल असेल, असेही ते म्हणाले.