मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (11:46 IST)

करोनानंतर आता ‘सारी’ संकट, औरंगाबादमध्ये 10 जणांचा मृत्यू

सर्वीकडे करोनाचा थैमान असताना एक नवं संकट समोर आले आहे. औरंगाबादमध्ये पसरत असलेल्या ‘सारी’ (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) आजारामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 23 रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
सारी आणि करोनाची लक्षणे सारखी असून या सर्व रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सारी आजारात सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास तसचं ताप हीच लक्षणे आहेत. सारीच्या रुग्णांचे करोनाच्या तपासणीप्रमाणे घशातील द्रव तपासणीसाठी घेला जात आहे.
 
प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे येथे आतापर्यंत 103 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे.