मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (10:19 IST)

Aurangabad : रिक्षा चालकाच्या गैर वर्तनामुळे तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

जरी आपल्या देशात स्त्रीला देवीचं रूप मानले असले तरीही सध्या सर्वत्र महिलांशी छेडछाडीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. औरंगाबादच्या क्रांतिचौकात एका रिक्षाचालकाने अल्पववयीन मुलीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली असता तरुणीने घाबरून धावत्या रिक्षेतून उडी मारल्याची घटना घडली असून पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे.सय्यद अकबर सय्यद हमीद असे या आरोपीचं नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. 
 
व्हिडीओ मध्ये दिसत आहे की  रस्त्यावरून एक रिक्षा वेगाने धावत आहे आणि काही वेळातच त्यातून एक तरुणी रस्त्यावर उडी घेऊन पडली आहे. काही लोकं तिच्या मदतीसाठी धावून गेल्याचे दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना मंगळवारची आहे. पीडित मुलगी कोचिंग क्लास मधून निघाल्यावर घरी जाण्यासाठी निघाली. गोपाल टी ते शिवाजी हायस्कूल परिसरात रिक्षातून प्रवास करणारी अल्पवयीन मुलगी रिक्षात एकटी असल्याचे फायदा उचलून रिक्षा चालकाने अश्लील प्रश्न विचारण्यास आणि अश्लील चाळे करण्यात सुरुवात केली. तिने रिक्षा घेतली काही वेळा नंतर रिक्षा चालकाने मुलीशी अश्लील संभाषण करायला सुरु केले आणि गैर वर्तन करू लागला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका केली.

उडी मारल्याने तिच्या डोकल्याला जखम झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षा चालकाच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. 
 
Edited By -Priya Dixit