बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (11:50 IST)

औरंगाबाद :दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले

Chikhalthan in Kannada taluk of Aurangabad
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात चिखलठाण येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. बेपत्ता झालेल्या दोन सख्य्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले. स्वाती दत्तू चव्हाण आणि शीतल दत्तू चव्हाण असे या मयत मुलींचे नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या दोघी मुली बेपत्ता असल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात 14 जानेवारी रोजी केली होती. 

दोघी बहिणींचा शोध घेताना दत्तू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत स्वातीचा मृतदेह तरंगत दिसला तर शीतलचा मृतदेह पाण्यातील गळात आढळला. घटनेची माहिती पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले नंतर दोघींचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit