1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Ayodhya tension due to Dharma Parishad, opposition to Thackeray

धर्म परिषदेमुळे अयोध्येत तणाव, ठाकरेंना विरोध

राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणाव वाढला आहे. हिंदू परिषदेने गुरुवारी मनाई हुकुम झुगारुन देत रविवारी होणाऱ्या धर्म सभेला पाठिंबा मिळवण्यासाठी अयोध्येमध्ये रोड शो केला.दुसरीकडे फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्म सभेला विरोध केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. 
पुढील लेख
नवे फीचर, Your Time on Facebook