मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (08:42 IST)

देशाचा विकासासाठी काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले आहे. जिल्हाचे पालक गिरीश महाजन आहेत. दोघांनाही जिल्हात फिरकायला वेळ नाही. राज्यातही शेतकरी आत्महत्या, वाढलेली महागाई, शेतमालाला हमी भाव नाही अशी अस्थिरता असतांना केंद्रात तर सरकार विरोधात जो बोलेल त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप होतो. अशा स्थिती देशाचा विकास करायचा असेल तर काँग्रेसला साथ द्यााविच लागेल - पक्षाला ताकद द्याा असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
 
भाजप निवडणुकीत सांगतात आमच्याकडे या. पैसे घ्या. उमेदवारी घ्या. अन्यथा तुमची फाईल तयार आहे. त्याला बळी न पडणारे फार थोडे आहेत. नगरला केडगावमध्ये आमदार कर्डिलेंमार्फत तोच प्रयोग करण्यात आला आहे. प्रचंड पैशाचा वापर भाजप करते आणि मंत्री गिरीश महाजन त्याचे मॅनेजमेंट करतात. त्यांच्याकडे तेव्हढेच काम आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
 
'कृषीथॉन' प्रदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. नगर महापालिका निवडणुकीत केडगावला पहाटे चारला आमदार कर्डिले यांनी काँग्रेसच्या पाच जणांना फोन केला. तुमच्या विरोधात असे गुन्हे आहेत. त्याची फाईल तयार आहे. त्यामुळे पैसे घ्या, भाजपची उमेदवारी घ्या अन्‌ निवडणुक लढा. अन्यथा कारवाई होईल असे धमकावले. ते उमेदवार भाजपमध्ये गेले आहेत भाजपा दबावाचे राजकारण करत आहे.
 
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पस्तीस हजार कोटींचे बजेट ठेवले आहे. प्रत्येक उमेदवाराला किमान दहा कोटी जरी दिले तरी काय होईल? हे मोठे दुर्देव आहे असे चव्हाण यांनी सांगितले आहे.