शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 एप्रिल 2024 (10:12 IST)

बबन घोलप यांनी शिंदे गटा सोबत जाण्याचा निर्णय घेतला

Babanrao Gholap
गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटावर नाराज असणाऱ्या माजी मंत्री बबन घोलप यांनी शिंदे गटा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डी लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे बबन घोलप नाराज होते. त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर करून ठाकरे गटातील  नेत्यांवर सडकून आरोप केले होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या उपनेते पदाचा राजीनामा देत फक्त शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचे जाहीर केले होते.
 
त्यानंतर त्यांनी चर्मकार समाजाचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी नेत असतांना राजकीय विश्लेषक यांच्या लक्षात घोलप यांची खेळी येत होती. शेवटी घोलप यांचा आज पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.
 
त्यानंतर त्यांनी चर्मकार समाजाचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी नेत असतांना राजकीय विश्लेषक यांच्या लक्षात घोलप यांची खेळी येत होती. शेवटी घोलप यांचा आज पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.
 
 बबन घोलप हे देवळाली विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा विधानसभेवर गेले तर राज्याचे समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांची कन्या नयना घोलप -वालझाडे यांना शिवसेनेने नाशिकच्या महापौरपदी विराजमान केले होते तर मुलगा योगेश घोलप यांना एकदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी ठाकरे यांनी दिली होती.

Edited by -Ratnadeep Ranshoor