शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (09:28 IST)

हेमंत गोडसे यांच्याबाबत सुषमा अंधारे यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या

Sushma Andhare
खासदार उन्मेश पाटील हे भाजपातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यांनी ठाकरे गटाचे खा संजय राऊत यांचीही भेट घेतली.
 
त्यामुळे पाटील ठाकरे गटात येतील आणि जळगावमधून निवडणूक लढवतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
त्या म्हणाल्या उन्मेश पाटलांचं माहिती नाही. पण हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील. भाजप सर्व्हेचे कारण दाखवत जास्त जागा पदरात पाडून घेत आहेत, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor