सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (21:36 IST)

राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागात पावसाची शक्यता

rain
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागानं आता सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, आज (4 एप्रिल) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे मात्र, अशातच आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या (5 एप्रिल) गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर 6 एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यातही हवामान विभागानं पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. तर 7 एप्रिलला देखील पश्तिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
 
या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. काळे ढग जमा झाले असताना किंवा वीजा चमकत असताना शेतकऱ्यांनी शेतात काम करु नये. शेतकऱ्यांनी अशा स्थितीत घराचा आश्रय घ्यावा. तसेच शेतकऱ्यांची शेतातील काही अर्धवट कामे राहिली असतील तर ती कामे देखील शेतकऱ्यांनी उरकून घ्यावीत.

Edited By- Ratnadeep Ranshoor