शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (22:01 IST)

बालभारतीकडून वर्षभरात शैक्षणिक चॅनेल सुरू करणार

बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे. तसेच बालभारतीतर्फे वर्षभरात स्वत: शैक्षणिक चॅनेल सुरू केला जाईल, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा व अभ्यासक्रमाबाबत येत्या १ फेब्रुवारीपासून तज्ज्ञ शिक्षकांकडून समुपदेशन करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संस्थेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त व किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात वर्षा गायकवाड बोलत होत्या. 
 
गायकवाड म्हणाल्या, महापालिका,नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशासाठी रांगा लागतात,याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. तसेच राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात.