सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (00:09 IST)

तेरेखोल नदीच्या पाण्याने बांदा-दाणोली मार्ग पाण्याखाली

water
बांदा- विलवडे माणयेहोळ येथे तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बांदा-दाणोली मार्ग पाण्याखाली गेला आहे. येथील वाहतूक सकाळपासून बंद होती. आज पहाटेपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. विलवडे येथे मोरीवर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद होता. विलवडे धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी येथील पाणी पातळी वाढली आहे. गतवर्षी विलवडे मळावाडी येथे पुराच्या पाण्याने हाहाकार माजवीला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. नुकसान होऊ यासाठी ग्रामस्थांनी घरातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.