शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (15:23 IST)

हुश्श..... बँक कर्मचाऱ्याचा दोन दिवसीय संप मागे

தனியாருக்கு விற்கப்படுகிறதா பொதுத்துறை வங்கிகள்?
मुंबईत उपमुख्य कामगार आयुक्तांच्या भेटीनंतर बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला नियोजित देशव्यापी संप तात्पुरता मागे घेण्यात आला आहे. याआधी आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी ३० आणि ३१ जानेवारी रोजी दोन दिवसीय संप पुकारणार होते.
 
पाच दिवसांचा आठवडा करणे, पेन्सनचे अद्ययावतीकरण, जुनी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) रद्द करणे, वेतन सुधारणा, सर्व विभागात पुरेशी भरती करणे आदी विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी ३० आणि ३१ जानेवारी दरम्यान दोन दिवसीय संप पुकारणार असल्याचे आवाहन केले होते. AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC या UFBU च्या घटक संघटनांचे सदस्य देशव्यापी बँक संपावर जाणार असल्याची माहिती देत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने हा संप जाहीर केला होता.
 
मुंबईत कामगार आयुक्तांसोबत दुसऱ्यांदा बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने हा संप मागे घेण्यात येत असल्याची माहिती एमपी बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष व्ही के शर्मा यांनी सांगितले.
Edited By- Ratnadeep Ranshoor