1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (09:06 IST)

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी

ashish shelar
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांना एका पत्राच्या माध्यमातून ही धमकी मिळाली असून हे पत्र त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.धमकीच्या पत्रात शिंदे गट, भाजपाविषयी असभ्य भाषेचा वापर
मुंबई पालिकेची निववडणूक कधीही जाहीर होऊ शकते. याच कारणामुळे भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार मागील काही दिवासांपासून मुंबईत भाजपा पक्षाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असतानाच आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी निनावी व्यक्तीने दिली असून धमकीचे पत्र शेलार यांच्या कार्यालयात आले आहे. धमकीच्या या पत्रानंतर शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor