रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (08:06 IST)

प्रकाश आंबेडकरांवर काही टीका-टिप्पणी करायची नाही-खासदार संजय राऊत

sanjay raut
प्रकाश आंबेडकर माझ्या पक्षाचे नेते नाहीत. पण मी त्यांचा आदर करतो. मी मानतो. आंबेडकरांना आम्ही मानतो. जितके बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यात भिनलेत तितकेच आमच्यातही आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांवर काही टीका-टिप्पणी करायची नाही. ते आमचे सहकारी आहेत. शिवसेनेसोबत त्यांची युती झालीय आम्ही त्यांचा आदर करतो. जेव्हा युती नव्हती तेव्हाही आदर करतच होतो. फक्त महाविकास आघाडीला तडा जाईल अशी विधाने करू नयेत. यात कुणाला राग येऊ नये असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना दिले आहे.
 
संजय राऊत म्हणाले की, माझे व्यक्तिगत वक्तव्य नाही. संजय राऊत व्यक्तिगत बोलत नाहीत. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता, पक्षाचा नेता, उद्धव ठाकरेंचा सहकारी आहे. त्यामुळे मी जे बोललो ते माझे व्यक्तिगत मत नाही. महाविकास आघाडी टिकावी आणि प्रत्येक घटक पक्षातील नेत्यांविषयी काळजीपूर्वक बोलावी आणि भूमिका घ्याव्यात असं सगळ्यांचे मत आहे. माझे शरद पवारांसोबत बोलणे झाले आहे. पवारांविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे आणि तो राहील असं त्यांनी सांगितले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor