सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (10:12 IST)

चंद्रपुरात साखर झोपेत काळाचा घाला बस अपघातात एक ठार ,12 जखमी

accident
चंद्रपुराच्या राजुरा तालुक्यात विरूर -धानोरा मार्गावर मजुरांना घेऊन जाणारी बस पालटून अपघात झाला. चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहे. छत्तीसगड येथून ही बस मजुरांना घेऊन हैद्राबाद जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आज पहाटे हा अपघात झाला. या बस मध्ये एकूण 32 प्रवासी प्रवास करत होते. ही ट्रॅव्हल बसचा प्रवासी झोपलेले असताना विरून-धानोरा मार्गावर वळण घेताना बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात होऊन बस पालटली.अपघाताच्या वेळी प्रवासी साखर झोपेत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 12 प्रवाशी गंभीर जखमी झाले. चेतन रात्रे मृत्युमुखी झालेल्या मजूराचे नाव आहे. अपघाताची मिळतातच विरूर पोलिसांनी अपघाताच्या स्थळी जाऊन बचाव कार्य सुरु केले. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
 Edited By- Priya Dixit