1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बीड , बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (11:27 IST)

रांजाभाऊ मुंडेंसह १६ जणांना ५ वर्षे कैद

बीड जिल्हा मध्यवती सहकारी बँकेतील बेकायदा कर्जवाटप प्रकरणात दाखल  झालेल्या विविध गुन्हांपैकी पहिल्या प्रकरणाचा निकाल आज लागला. घाटनांदूरच्या शेतकरी सहकारी तेलबिया प्रक्रिया संस्‍थेला देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणी या गुन्हात डीसीसीचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासहित १६ जणांना ५ वर्षे तुरुंगवास आणि आणि ६0 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 
 
घाटनांदूर येथील शेतकरी सहकारी तेलबिया प्रक्रिया संस्थेला बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने 2009 मध्ये तब्बल २ कांटी ७५ लाखाचे कर्ज दिले होते. हे कर्ज बेकायदा दिल्याचा ठपका ठेवत लेखा परीक्षणातील  अहवालानुसार जिल्हा बँकेच्या बड्या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे या कर्जप्रकरणांची मंजुरी बँकेच्या मुख्यालयात होण्याऐवजी नायगाव येथील विश्रामगृहाबर घेण्यात आली होती. 
 
या प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. व्ही. एम सुंदाळे यांच्या न्यायालयात पूर्व झाली.