रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (13:23 IST)

Teacher Suicide स्टेटस ठेवून शिक्षकाची आत्महत्या

suicide
Teacher Suicide बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या अंतरवन पिंपरी शिवारात ही घटना घडली असून 35 वर्षीय शिक्षकाने हे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
बीडमधील आश्रमशाळेवर कार्यरत असणार्‍या शिक्षकाने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंकुश रामभाऊ पवार असे या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मृत शिक्षकाच्या नोटमध्ये ब्लॅकमेल करून मारण्याची धमकी दिली जात असल्याचा उल्लेख केला गेला आहे. कुटुंबालाही धमक्या दिल्या जात असल्याचे म्हटले आहे. चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.