शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2023 (13:37 IST)

कोल्हापूर बंदला हिंसक वळण

Kolhapur bandh turns violent
Aurangzeb Status औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आता याला हिंसक वळण आले आहे.
 
या संबंधात हिंदुत्ववादी संघटनाने शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले आहे. काल हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले होते. दरम्यान बंदची हाक असताना शहरात काही ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना घडली असून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तरी भर उन्हातही हे आंदोलन सुरूच असून यात उद्धव ठाकरे शिवसेनेसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. 
 
या प्रकरणी कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागत म्हटले की शिंदे फडणवीस सरकारच्या काळात औरंगजेबाचे फोटो कसे नाचवले कसे जातात? हे सरकारचे अपयश असल्याचे संजय राऊत म्हणाले.