मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2023 (19:23 IST)

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरूषांनी साजरी केली 'पिंपळ पौर्णिमा

social media
शनिवार 3 जून रोजी वटपौर्णिमेच्या सण साजरा केला जाणार आहे. सवाष्ण बायका सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालतात आणि प्रार्थना करतात. पण सात जन्मी हीच पत्नी नको असं म्हणत पत्नी पीडित पतींनी छत्रपती संभाजी नगर येथे पिंपळाला प्रदक्षिणा घालत वट पौर्णिमा साजरी केली. 
छत्रपती संभाजी नगर येथे वाळूज भागात आज काही पत्नी पीडित पतींनी पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. पिंपळाच्या 108 उलट्या प्रदक्षिणा घालत पुरुषांनी पूजा केली. 

छत्रपती  संभाजी नगर मध्ये 2017 पासून पत्नी पीडित संघटना पीडित पतींसाठी काम करत आहे. या साठी वाळूज येथे पत्नी पीडित आश्रम सुरु करण्यात आले आहे. 

या आश्रमातून पत्नी पीडित पुरुषांना मदत केली जात आहे. घरातून बाहेर काढलेले पुरुष या ठिकाणी राहतात. बायको पासून सुटका व्हावी म्हणून पुरुषांनी पिंपळाच्या 108 उलट्या प्रदक्षिणा घालून पूजा केली आहे. 


Edited by - Priya Dixit