गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2023 (08:27 IST)

छत्रपती संभाजीनगर: बारावीच्या 372 उत्तरपत्रिकांमधील दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध लागला

बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या 372 उत्तरपत्रिकांमधील दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध अखेर लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दोन प्राध्यापकांचाच हा प्रताप असल्याचे उघड झाले असून, प्राध्यापकांसह त्यांच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.छत्रपती संभाजीनगर बोर्डातील बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या 372 उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीने लिहिलेले हस्ताक्षर आढळून आले होते. हे अक्षर कुणाचे आणि कशासाठी लिहिले याचा शोध बोर्ड घेत होते. अखेर 15 दिवसानंतर या हस्ताक्षराचा शोध लावण्यात बोर्डाला यश आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाचे काम करणाऱ्या दोन प्राध्यापकांचाच हा प्रताप असल्याचे उघड झाले आहे. राहुल भगवानसिंग उसारे आणि मनीषा भागवत शिंदे अशी या प्राध्यापकांची नावे आहेत.
 
या प्राध्यापकांसह पडद्यामागील साथीदारावर 420, 467, 468, 469 व 470 कलमाअंतर्गत फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor