1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2023 (11:18 IST)

छत्रपती संभाजीनगर : झुडपात सापडले 2 दिवसांचे नवजात अर्भक

baby
छत्रपती संभाजी नगरात क्रांती चौकात समतानगर येथे शनी मंदिराजवळ तोंडात बोळा कोंबून पिशवीत दोन दिवसांचे बाळ झुडप्यात फेकून देण्यात आले. पोलिसांची वेळीच मदत मिळाल्यामुळे बाळा सुदैवाने वाचला. बाळाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून महिला बाळ कल्याण समितीकडे देण्यात आले. 
 
पोलिसांना भागवत जाधव यांनी फोन करून क्रांति चौकातील समतानगर शनिमंदिरा जवळ एका पिशवीत बाळाच्या तोंडात बोळा कोंबून झुडप्यात आढळल्याचे कळविले. 

माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या दोन दिवसाच्या बाळाला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले. आणि महिला बाल कल्याण समितीकडे दिले. बाळ सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत आहे. या बाळाला कोणी आणि कशाला फेकले याचा शोध पोलीस लावत आहे. बाळ अनैतिक संबंधातून जन्मलेले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
 
Edited by - Priya Dixit