गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (12:14 IST)

छत्रपती संभाजी नगर : काय सांगता, एचएससी बोर्डात फिजिक्सच्या 372 उत्तरपत्रिकेत एकच हस्ताक्षर

छत्रपती संभाजी नगर : बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून बोर्डात खळबळ उडाली आहे. हे सर्व प्रकरण राज्य शिक्षण मंडळाला कळविण्यात आले असून अधिकाऱ्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. या उत्तरपत्रिका बीड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या आहे. गेल्या आठ दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरु असून शिक्षण मंडळाचे अधिकारी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकले नाही.

तब्बल 372 उत्तरपत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर कसे आले हे सर्व कसे शक्य झाले. उत्तरपत्रिका बाहेर देण्यात आल्या होत्या की सेंटरवर हे करण्यात आले. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. या प्रकरणाच्या संदर्भात चौकशी करण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना या प्रकारांची चौकशी केल्यावर त्यांनी ते आम्ही नाही अशे काहीसे उत्तर दिले. 
 
 
Edited by - Priya Dixit