शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2023 (16:05 IST)

Sambhaji Nagar : लिफ्टमध्ये डोके अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

Sambhaji Nagar News : लिफ्ट मध्ये चढताना आणि उतरताना मोठी काळजी घ्यावी लागते आणि सोबत लहान मुलं असतील तर काळजी जास्त घावी लागते. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता असते. 
 
छत्रपती संभाजी नगर शहरात कटकट गेट जवळील रुग्णालय परिसरात एका लिफ्टमध्ये डोके अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. साकिब सिद्दीकी असे या मयत मुलाचे नाव आहे. साकिबचे वडील इरफान हे एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात काम करतात त्यांचे मुख्य कार्यालय हैद्राबाद येथे आहे. कामासाठी आई वडील हैद्राबाद गेले असता साकिबला आजी आजोबांच्या घरी ठेवले होते. 
 
रविवारी रात्री साकिब लिफ्ट मध्ये खेळत होता. खेळता खेळता त्याने आपले डोकं लिफ्टच्या बाहेर काढले आणि तेवढ्यात लिफ्ट सुरू झाली आणि त्याचे डोकं धडाहून वेगळे झाले तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर जोराचा आवाज झाला आणि इमारतीतील सर्व रहिवाशी लिफ्ट जवळ तिसऱ्या मजल्यावर पोहोचले आणि तिथले दृश्य बघून त्यांना धक्काच बसला.तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता  घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे साकिबच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 
 
 

Edited By -Priya Dixit