सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (14:12 IST)

Belgaon Accident : स्कूलबस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

accident
बेळगाव जिल्ह्यात अथणी येथे आज सकाळी स्कूल बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 10 विद्यार्थी जखमी झाले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अथणीहून स्कूलबस 11 वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांना घेऊन बनजवाड येथे निघाली होती. त्यावेळी समोरून मिरजहून अथणीच्या दिशेने प्लास्टिक पाईप भरून येणाऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात बस आणि ट्रक चालकाचा मृत्यू  झाला.तर चालकाच्या जवळ बसलेले काही विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर जखमीझालेल्या विद्यार्थ्यांना पाहून बसमधील विद्यार्थिनी आरडाओरड केला.

घटनास्थळी जमलेल्या लोकांनी अपघातात बस मध्ये अडकलेल्या विद्यार्थीना अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी हे पर गावीचे असून अथणी येथे हॉस्टेलमध्ये राहतात. या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून हायस्कूल आणि कॉलेजकडे नेत असताना अपघात घडला. अपघाताची माहिती मिळतातच अथणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पाठविले.