मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (09:30 IST)

उगाच डरकाळी फोडू नका, मुंबई कुणाच्या साहेबांची नाही - नितेश राणे

nitesh rane
"वरळीमध्ये उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कुणी करू नये. मुंबई ही कुणाच्या साहेबांची नाही. मुंबई ही असंख्य सर्वसामान्य मुंबईकरांची आहे, हे लक्षात ठेवावं," अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
 
वरळी येथील जांबोरी मैदानात सचिन अहीर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी दहीहंडी आयोजित करण्यात येत होती. पण यंदा भाजपकडून या मैदानात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावरून राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टोमणा मारल्याचं पाहायला मिळालं.
 
राणे म्हणाले, वरळीच भाजपला आव्हान देण्याची हिंमत कुणीही करू नये, विधानसभेत साधं मी म्याव म्याव आवाज काढल्यानंतर काय अवस्था झाली होती, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणून उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कुणीही करू नये."
ते म्हणाले, "गेल्या काही महिन्यात दिल्लीच्या अबकारी विभागाने मद्य खरेदी करण्यासाठी, महसूल व्यवस्थेतील त्रुटी कमी करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली होती. या समितीच्या अहवालात जनतेने 14,700 सूचना दिल्या होत्या. त्यांचाही समावेश करण्यात आला होता."