बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (16:54 IST)

उर्जामंत्री राऊत यांचे निर्णयही प्रशासन मानत नाही असे म्हणत भाई जगताप यांची महापारेषणच्या कारभारावर टीका

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांवरच निशाणा साधला आहे.उर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्णयही प्रशासन मानत नाही.लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मागू असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.महापारेषण कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली बीकेसीतील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आलं.
 
“मंत्रीमहोदयांचे आदेश पाळले जात नसतील आणि प्रशासन इतकं उद्दाम असेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. त्यासाठी हे आंदोलन त्यांना इशारा आहे,”असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.“मंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा आमचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.आमचे प्रश्न सुटले नाहीत तर त्यांचाही राजीनामा मागू,”असा इशारा भाई जगताप यांनी यावेळी दिला.
 
मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला आणि जनसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता असे अशिष देशमुख यांनी म्हटले आहे.
 
१९,२० वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रिया अंतिम टप्यावर आली आहे,अशा परिस्थितीमध्ये सरकारने नवीन वकील ॲड.आसिफ कुरेशी यांची नियुक्ती त्या ठीकाणी केली.ॲड.आसिफ कुरेशी हे महाराष्ट काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आहेत.सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत.म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?,अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यामुळे ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड.उज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी,अशी मागणी अशिष देशमुख यांनी केली आहे.