शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (15:46 IST)

बुलढाण्यात भीषण अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू,18 प्रवासी जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपासवर एका एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन एक वृद्ध महिला जागीच ठार झाली.तर 18 प्रवासी जखमी झाले.
 
ही बस सकाळी यवतमाळच्या बस डेपोतून औरंगाबादच्या दिशेने 25 प्रवाशांना घेऊन निघाली होती.पण या बसचा बुलढाण्यात देऊळगाव राजा बायपास मार्गावर अपघात झाला.या बसला एका ट्रकने धडक दिली.धडक एवढी जोरदार असे की बसचा काही भाग चकनाचूर झाला आहे.या अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच दुर्देवी अंत झाला.तर 18 प्रवासी जखमी झाले.अपघात इतका भयंकर होता की धडक झाल्याचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक लगेच धावत आले.त्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.या यापैकी 6 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहे.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.