रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (11:04 IST)

धक्कादायक बातमी ! अंधश्रद्धेला बळी पडून दलित कुटुंबासोबत अमानुष कृत्य

अवघ्या महाराष्ट्राला लाज लावणारी धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. अंधश्रद्धेला बळी पडून गावातील काही लोकांनी एकत्र येऊन एका दलित कुटुंबासह अमानुष कृत्य केल्याचे वृत्त मिळाले आहे.हे अमानुष कृत्य कोणताही पुरावा नसताना केवळ अंधश्रद्धेला बळी पडून केले गेले आहे. 
 
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीपासून सुमारे 12 किमी अंतरावर असणाऱ्या वणी खुर्द गावात घडली आहे. भानामती केल्याच्या संशयातून कोणतेही पुरावे नसताना एका दलित कुटुंबातील सात सदस्यांना भरचौकात नेऊन त्यांचे हात पाय बांधून मारहाण केली आहे.या सात पैकी 5 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.त्यांची प्रकृती गंभीर आहे.माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडल्यावर अद्याप पोलिसांनी किती लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ?किती आरोपींना अटक केली आहे?या विषयी माहिती अद्याप मिळालेली नाही.