शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (10:15 IST)

मंत्रालयाच्या बाहेर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

Death of a farmer who was poisoned outside the ministry Maharashtra News Regional News In Marathi Webdunia  Marathi
मंत्रालयात एका शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या  शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.सुभाष सोपान जाधव(54)असं या शेतकऱ्याचं नाव आहे.सुभाष पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर जाधववाडी इथले रहिवाशी होते.20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास सुभाष जाधव मंत्रालयाच्या परिसरात आले.त्यानंतर त्यांनी गार्डन परिसरात पोहोचून कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कीटनाशक प्राशन केल्यानंतर सुभाष जाधव जमिनीवर कोसळले. परिसरात तैनात असणाऱ्या पोलिसांचे ताबडतोब या घटने कडे लक्ष गेले.त्यांनी तातडीने शेतकऱ्याला रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 
 
प्रकरण असे आहे की, जमिनीच्या व्यवहारात त्यांची फसवणूक झाल्यावर ते प्रचंड तणावात होते.त्यांना न्याय मिळावा या साठी ते मंत्रालयात गेले.सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये एका सावकराने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली.एवढेच नव्हे तर सावकराने त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आणि राहते घर सुद्धा पाडून टाकले.असं नमूद केलं होतं.

याबद्दल सुभाष जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.  माझ्याकडे मुद्दल देण्यासाठी देखील पैसे नव्हते, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असं सुभाष जाधव यांनी पत्रात नमुद केलं होतं.या प्रकरणी आरोपी विलास शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुभाष जाधव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.त्यांचे कुटुंबीय सुभाष यांचा मृतदेह ताब्यात घेऊन गावी रवाना झाले आहे.