सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (10:35 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दही हंडी उत्सवा बाबत गोविंदा पथकांच्या प्रतिनिधी सह बैठक

आज गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेणार.आज दुपारी साढे बाराच्या सुमारास ही बैठक होण्याचे सांगितले जात आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी काही निर्बंध लावण्यात आले आहे.जन्माष्टमी काहीच दिवसांवर येत आहे.त्या मुळे यंदाच्या दही हंडी उत्सवासाठी काय निर्णय घेतले जाणार या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.सध्या कोरोनामुळे दहीहंडी उत्सवाबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे.आज दुपारी साढे बाराच्या सुमारास मुख्यमंत्रांची गोविंदा पथकांच्या प्रमुखांसह होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.