शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भारिप-बहुजन महासंघाने मागितल्या आघाडीकडे बावीस जागा

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का, याबाबतचा अजून प्रश्न आहे.  याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी सर्वांची बैठक झाली आहे. बैठकीला सोबत  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, वंचित बहुजन विकास आघाडीकडून लक्ष्मण माने उपस्थित होते.  
 
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अकोल्यात असल्याने या बैठकीला उपस्थित नव्हते, यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची मागणी केली असे अमोर येते आहे. त्यामध्ये बारामती, नांदेड, माढा या तीन जागांचाही मागणी केली आहे.  त्यामुळे खरंच त्यांना महाआघाडीमध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा होणार होती. मात्र, त्यांनी आपले प्रतिनिधी पाठविले होते. जर वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत सामील झाली नाही तर याचा फटका सर्व पक्षांना पडणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष आहे.