मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 25 एप्रिल 2022 (21:26 IST)

मनपा बैठकीत भुजबळांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती!

chagan bhujbal
शहरात मनपाकडून सुरू असलेले अनावश्यक भूसंपादन बांधकाम आणि शहरात साकारण्यात येणार असलेल्या उड्डाण पूलाच्या सुरू असलेल्या बांधकामासंदर्भात देखील फेरविचार करण्याच्या सूचना भुजबळांनी मनपा आयुक्तांना  दिल्या आहेत.
 
महापालिकेपासून दोन हात लांब राहणारे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज महापालिकेत लक्ष घातले असून थेट मुख्यालयात बैठक (NMC Meeting) घेऊन झाडाझडती घेतली. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले चे पाहायला मिळाले. नाशिक महानगर पालिकेवर प्रशासकीय राजवटीनंतर (Administrative) आज पहिल्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिकेत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
 
अलीकडेच नाशिक मध्ये येऊन गेलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर भुजबळ यांनी ही बैठक आयोजित केली. यामध्ये चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक, स्मार्ट सिटी, उड्डाणपूल आदी विषयांना हात घालण्यात आला.
 
दरम्यान सुरुवातीला अत्यंत दणक्यात चालणाऱ्या फाळके स्मारकाची रया गेली आहे. त्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या वादग्रस्त विषयांकडे देखील भुजबळ यांनी यावेळी लक्ष वेधले. नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी कामे सुरू केल्याने दहीपूल आणि परिसरात पावसाच्या पाण्याचा धोका अधिक वाढल्याने येथील व्यापाऱ्यांनी देखील तक्रार केली होती. त्या संदर्भात देखील भुजबळांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
 
तसेच बहुचर्चित उड्डाणपुलासंदर्भात देखील भुजबळांनी मौन सोडले. सदर उड्डाणपूलाचे बांधकाम करण्याची आवश्यकता नाही, तर लोकांची गरज ओळखून आवश्यक ती काम शहरात केली गेली पाहिजे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. तर पालकमंत्री छगन भुजबळ आढावा बैठक घेणार असल्याने मनपा कार्यालयात मोठ्या प्रमाणात मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.