शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (13:11 IST)

राज्य सरकारची मोठी घोषणा , तलाठी पदासाठी होणार मेगा भरती

राज्यात वाढत्या बेरोजगारीला कमी करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळावा या साठी राज्य सरकार कडून तलाठी पदासाठी मेगा भरती केली जाण्याची घोषणा केली आहे.राज्यात 3 हजाराहून अधिक तलाठी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ही भरती नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, या विभागातून तलाठी पदासाठी भरती केली जाणार असून या व्यतिरिक्त कोकण जिल्ह्यात तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, ठिकाणी तलाठी पदासाठी एकूण पदे 550 तर महसूल मंडळाचे 91 पदे उत्तर महाराष्ट्रात नाशिक महसूल विभागात नंदुरबार, जळगाव, धुळे, अहमदनगर या भागात तलाठीची एकूण 689 पदे रिक्त आहे. तर महसूल मंडळाचे 115 पदे रिक्त आहे. औरंगाबाद मध्ये परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर मध्ये एकूण 685 पदे रिक्त आहे. 

विदर्भात देखील नागपूर महसूल विभागात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, आणि भंडारा मध्ये तलाठीसाठी एकूण 478 पदे आणि महसूल अधिकारीसाठी 80 रिक्त पदे भरण्यात येतील. पुणे विभागात महसूल विभागात पुणे, सातारा , सांगली, सोलापूर, कोल्हापुरात 602 पदे तलाठीची तर 100 पदे महसूल अधिकाऱ्यांची भरली जाणार. अमरावती महसूल विभागात अकोला, बुलडाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात तलाठीच्या एकूण 106 पदे तर महसूल अधिकाऱ्यांची 18 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. 

Edited By- Priya Dixit