राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भोंगे विरोधी आंदोलनामुळे जीवे मारण्याची धमकीचं पत्र मिळालं आहे . मिळालेल्या धमकीच्या पार्शवभूमीवरून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज ठाकरे यांना Y + अशी सुरक्षा मिळणार असून त्या ताफ्यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढविण्यात आले आहे.
मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी धमकीचं पत्र आल्याची माहिती देत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. त्यात राज ठाकरे यांना सुरक्षा देण्यात यावी अशी चर्चा झाली.राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र्रात उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली.त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विषयाची माहिती दिली. त्यावरून चर्चा करून आज ठाकरे सरकार ने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला.