suvichar
✕

महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट

Updated: गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (09:56 IST)
 
हवामान विभागाने देशात आतापर्यंत झालेल्या पावसाची माहिती दिली. देशात सरासरीच्या ९ टक्के पाऊस कमी झाला. आतापर्यंत देशात ९१ टक्के पाऊस झाला. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. जूनपासून केरळात सरासरीच्या ४८ टक्के पावसाची तूट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या २२ टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील १ जूनपासून सरासरीच्या १९ टक्के पावसाची तूट झाली आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
 
संपूर्ण महाराष्ट्रात उणे ५८ टक्के तूट
ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे ५८ टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे.
 
मराठवाड्यात विदारक स्थिती
पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण तिथे सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला. राज्यातील १५ जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

बोधगया येथे महाराष्ट्र भवन उभारले जाणार, मंत्री संजय शिरसाठ यांची बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी भेट

महाराष्ट्रात स्मार्ट कार्ड अनिवार्य केल्याने एसटी बसेसचे १५० कोटी रुपयांचे नुकसान! परिवहन मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

नागपुरात भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य आकाशात प्रदर्शित होणार; आजपासून 'एअर फेस्ट २०२६' सुरु होणार

LIVE: नागपूरमध्ये आजपासून 'एअर फेस्ट २०२६' सुरू होणार

पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा रद्द; १२ डिसेंबर रोजी शरद पवार स्वतः प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करणार

पुढील लेख
Show comments