तेलंगणात पोलिसांना मोठे यश, चकमकीत सात माओवादी ठार
तेलंगणा पोलिसांना मोठे यश मिळाले असून चकमकीत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात झाली.
तेलंगणा पोलिस आणि माओवाद्यांमध्ये रविवारी सकाळी मुलुगु जिल्ह्यातील एथुरंगाराम मंडलच्या चालपाका भागातील जंगलात चकमक झाली, असे पोलिसांनी सांगितले. या चकमकीत येलांडू-नरसंपेट क्षेत्र समितीचा कमांडर बद्रू उर्फ पपण्णा ठार झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या चकमकीबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
तेलंगणा पोलिस आणि माओवाद्यांमध्ये रविवारी सकाळी मुलुगु जिल्ह्यातील एथुरंगाराम मंडलच्या चालपाका भागातील जंगलात चकमक झाली, असे पोलिसांनी सांगितले.
Edited By - Priya Dixit