सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (14:16 IST)

Sukma: सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील भेज्जी पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी तीन स्वयंचलित रायफल आणि इतर शस्त्रे जप्त केली आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. अनेक नक्षलवादी ओडिशातून छत्तीसगडमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. डीआरजीची टीम नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी निघाली होती. दोन्ही बाजूंनी शेकडो गोळीबार करण्यात आला. अनेक स्वयंचलित शस्त्रेही सापडली आहेत.
 
ही चकमक कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम, भंडारपदरच्या जंगल-टेकड्यांमध्ये झाली. या भागात सैनिक शोध मोहीम राबवत होते. शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी बराच वेळ गोळीबार सुरू होता.
बस्तरच्या अधिकाऱ्यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. चकमकीत 10 नक्षलवादी मारले गेले.सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit