मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (15:12 IST)

बर्थडे सेलिब्रेशन आलं अंगाशी, तरुणाचा चेहरा भाजला

birthday fire
अंबरनाथ - एका तरुणाला हंगामेदार वाढदिवस साजरा करणे भलतेच महागात पडले आहे. सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात शोभेचा फाउंटेन पेटल्याने तरुणाचा चेहरा भाजला आहे.
 
व्हायरल झालेला हा व्हिडिओ अंबरनाथच्या बुवापाडा परिसरातील असल्याचे सांगितले जात असून यात राहुल नावाच्या एका तरूणाचा वाढदिवस साजरा केला जात होता. तेव्हा केकवर शोभेचा पाऊस लावण्यात आला. ते पेटवून तरुणाच्या तोंडात धरण्यासाठी देण्यात आला. नंतर या तरुणावर अंडी फेकून मारण्यात आली. त्यामुळे तोंडातील जळत असलेला शोभेचा पाऊस या तरुणाने हातात पकडला. याचवेळी या तरुणाच्या अंगावर त्याच्या एका मित्राने पीठ टाकले. मात्र यामुळे आगीचा मोठा भडका उडाला, ज्यात बर्थडे बॉय चांगलाच होरपळून निघाला.
 
या घटनेबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.