मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (08:31 IST)

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

dhananjay munde
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
 
 मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना सायंकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून, रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. 
 
धनंजय मुंडे आणि डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली. धनंजय मुंडे यांच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या. डॉ. समधानी हे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी काही रिपोर्ट काढले असून, ते नॉर्मल आहेत. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचे कारण नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले.