शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महाराष्ट्र भाजपने चुकून केले असे ट्विट, झाले ट्रोल

महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या @BJP4Maharashtra या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ट्विट करण्यात आले होते. राज्य प्रशासनात दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना देवेंद्र फडणवीस सरकार ३० टक्के कर्मचारी कपात करायला निघाले आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ आहे की ‘फूल इन महाराष्ट्र’ असे दोन हॅशटॅगही या ट्विटमध्ये वापरण्यात आले.

तसेच हा ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेस, संजय निरूपम, सचिन सावंत या सगळ्यांना टॅगही करण्यात आले होते. चुकून टाकण्यात आलेल्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली. चूक लक्षात आल्यावर हा ट्विट हटवण्यात आले. मात्र या ट्विटचा स्क्रीन शॉटही व्हायरल होतो आहे.
 
दुसरीकडे अनेक नेटकऱ्यांनी या ट्विटवरून महाराष्ट्र भाजपची खिल्ली उडवली आणि त्यांना ट्रोल केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ट्रोल करण्यात आले.