मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (11:00 IST)

पुढील महिन्यात ट्रम्प कन्या येणार भारतात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच पुढील महिन्यात भारतात येणार असल्याचंही इवांका यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी इवांका ट्रम्प यांना जागतिक उद्योजगता परिषदेचं नेतृत्व भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याच निमंत्रणानुसार नोव्हेंबर महिन्यात इवांका ट्रम्प भारतात येणार आहेत. पुढील महिन्यात हैदराबादमध्ये ही परिषद होणार आहे.

दोन दिवसांपूर्वीचं इवांका ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.