रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (09:37 IST)

सामना संपादकीयतून भाजपावर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावरुन सामना संपादकीयच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? राजनाथ म्हणतात, ‘संयम.’गडकरी म्हणतात, ‘सहमती’व सरसंघचालक सांगतात, ‘रामाचीही वेळ येईल.’पंचवीस वर्षे राम उघडय़ा तंबूत व आपण सारे सत्तेच्या खुर्च्या उबवत आहोत. पुन्हा राममंदिरावर कोणी काही बोलायचे नाही. राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला, ज्यांनी मंदिरासाठी बाबरी पाडली त्यांच्यावरचे खटलेही तुम्ही काढू शकत नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपून जमाना झाला. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रपती होणार नाहीत. तेव्हा बाबरी पतनाचे खटले काढा व बाबरीचे कोर्ट तरी बरखास्त करा. श्री. गडकरी, इथे तरी सहमती होऊ द्या! असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.