बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (17:53 IST)

भाजपच्या आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल

बीड मध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. बीड मध्ये आष्टी तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांच्या पत्नी माधुरी चौधरी यांनी गेल्या आठ महिन्यांपूर्वी फिर्याद दिली. की आमदार सुरेश धस हे आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घराची संरक्षक भिंत पाडून आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटर ने कापून घरात शिरले.  त्यांच्या फिर्यादीवरून आमदार सुरेश धस आणि इतर 38 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यात दरोड्या सारख्या गंभीर गुन्हा वाढवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहे. नायायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता त्यांच्यावर दरोडा घालणे, बळजबरी घरात घुसून धमकावणे आणि भीती दाखवणे आणि शांतता भंग करण्याचे आरोप आहे.