शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (17:51 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपला घणाघाती टीका

uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकी संदर्भात आयोजित केलेल्या ऑनलाईन सभेला व्हिडीओ कॉन्फरन्स च्या मध्यातून संबोधित केले. 
 
ते म्हणाले आम्ही कमी पडलो तरी चालेल पण खोटं बोलणार नाही. भाजपला सोडलं म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं असं नाही. भाजप हे हिंदुत्व नव्हे. कोल्हापूर हा भगव्याच्या बालेकिल्ला आहे .मर्दाने मर्दा सारखे लढायला पाहिजे. लढायचे कसे हे कोल्हापूरकरांच्या कडून शिकावं. आम्ही शिवसैनिक आहोत. पाठीमागून वार करण्याची परंपरा आमची नाही. हिंदुहृदय सम्राटांनी निर्माण केलेली ही शिवसेना आता राहिली नाही. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.त्यावर उत्तर देताना ते म्हणाले भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडले नव्हे. 
 
गेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसला लपून छपून मदत केली होती.त्यांनी सांगावं की त्यांनी मदत केली होती की नाही? भाजप दरवेळी धार्मिक मुद्द्याव पुढे आणते.कारण त्यांच्याकडे क्तुत्वाचे सांगण्यासारखे काहीच नाही. 
 
भाजप ओरडून सांगतात की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. तुम्ही म्हणजे काही हिंदुत्त्व नाही.
आम्ही कमी पडलो तरी चालेल पण खोटं बोलणार नाही. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला असल्यानं जयश्री जाधव निवडून येणारच.असा विश्वास आहे.भाजपला हिंदू हृदय सम्राटवर प्रेम असेल तर त्यांनी नवी मुंबई विमान तळाला त्यांचं नाव देण्यास विरोध कशापाई केला. असं त्यांनी जोरदार टीका भाजपवर केली आहे.