सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (15:19 IST)

शिवसेना हिरवी सेना झाल्याची भाजपची टीका

भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत शिवसेना हिरवी सेना झाल्याची टीका केलीय.  नितेश राणे म्हणाले की, ‘एमआयएम’ हा कट्टरतावादी पक्ष आहे. टोकाची भूमिका घेतो. ज्या पद्धतीने शिवसेना अजानची स्पर्धा घेते. टिपू सुलतानच्या नावाचा गवगवा करते. एकंदरीत हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युलर म्हणवून घेण्याचे काम करते आहे. सध्या एका ‘एमआयएम’ या कट्टरतावादी पक्षाला तुम्ही हवे हवेसे वाटता, तर उद्या तुम्ही ‘आयसीस’ला ही आवडणार. आता ‘आयसीस’ बरोबर चर्चा करण्याचेच राहिले आहे. उद्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतील की आम्ही ‘आयसीस’ बरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानला चाललोय. एवढेच राहिलेले आहे. करून दाखवलं, याचा खरा अर्थ आज शिवसेनेने महाराष्ट्रासमोर करून दाखवला.