1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (09:24 IST)

पुणे : काकडेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकवले

bjp sanjay kakade

पुण्यात भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकवले आहेत. एव्हरी डे इज नॉट काक 'डे' अशा आशयाची पोस्टर्स पुणे महापालिकेजवळ लावण्यात आली आहेत. स्वतंत्र यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करुन काकडेंनी गुजरातच्या निकालाचं भाकित केलं होतं. यात त्यांनी गुजरातमध्ये भाजपचा दारुण पराभव होईल असं सांगितलं होतं. तसेच, काँग्रेस बहुमताच्या जवळ असेल असंही भाकित त्यांनी वर्तवलं होतं. त्यामुळे पुणे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.

दरम्यान, संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपल्या भाकितावरुन यू-टर्न घेतला आहे. मोदींचा करिश्मा गुजरातच्या जनतेनं दाखवून दिला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही भाजप निवडून येईल, असंही भाकित त्यांनी व्यक्त केलं आहे.