गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (23:40 IST)

विधानसभा निवडणुकीत भाजपचं एकच इंजिन असेल : फडणवीस

BJP will have only one engine in Assembly elections: Fadnavis
येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं एकच इंजिन असेल असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? असा सवाल केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.
 
फडणवीस यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. मनसे आणि भाजप एकत्र येणार का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर २०२४ मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
 
यावेळी त्यांना तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचं सांगितलं गेलं. त्याचं त्यांनी स्वागत केलं. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनीही राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे. परंपरेने नेतृत्व येत असेल तर त्या नेतृत्वाकडे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्याही येतील, असं ते म्हणाले.