1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (18:44 IST)

मोटरसायकल रॅली काढून केले आंदोलन

मूर्तिजापूर तालुक्यात मंजूर झालेल्या काटेपूर्णा बॅरेजमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश आहे. असून या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असल्याने गावाचे १०० टक्के पुनर्वसन करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गाव शंभर टक्के पुनर्वसन करण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली असून टप्प्या टप्प्याने करण्यात येत असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी ६ अॉगष्ट मोटरसायकल रॅलीने आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
 
गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्या वतीने २ डिसेंबर २०१० रोजी सदर केला व गाव शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते.
 
त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभाा बुद्रुक गावांमध्ये विकासाची कामे करणेबाबत पूर्ण मनाई करण्यात आलेली आहे. व पुनर्वसनाबाबतची कामे एक वर्षाच्या आत सुरू होणार आहेत अशी माहिती सरपंच व सचिव ग्रामपंचायत यांना पाठवलेल्या पत्रातून कळवले होते. परंतु अद्याप पर्यंत या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.
 
गेल्या ११ वर्षापासून सदर गावाचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. गावाच्या तिन्ही बाजूला काटेपूर्णा नदी वाहत असल्याने आणि एका बाजूला नाला असल्याने पूर्ण गाव पाण्याच्या धोक्यात आहे. तरीदेखील पुनर्वसनाबाबत टाळाटाळ का करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या पत्रा प्रमाणे जांभा गावाचे पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
 
या समिती द्वारे रास्ता रोको, जेल भरो, सामूहिक आत्मदहन आंदोलने करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले. याच आंदोलनातील पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी जांभा गावापासून मूर्तिजापूर उपविभागीय कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढून उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. या रॅली मध्ये बहुसंख्य गावकरी सहभागी झाले होते.