सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (12:19 IST)

म्हणून उच्च न्यायालयाकडून गर्भपाताला परवानगी

जन्माला येणा-या बाळाची वाढ कधीच होणार नसल्याने व त्याच्यातील अन्य व्यंगामुळे, त्याच्या व आईच्या जिवाला धोका असल्याने उच्च न्यायालयाने २५ आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्यास  परवानगी दिली.

मुंबईतील २५ आठवड्यांच्या गर्भवतीला उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा दिलासा दिला. संबंधित महिलेने २२ आठवड्यांनंतर सोनोग्राफी केल्यानंतर गर्भामध्ये अनेक व्यंग असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. बाळ जन्माला आले, तर त्याची वाढ होणे शक्य नव्हते, तसेच त्याच्यातील व्यंगामुळे त्याला व आईच्या जिवाला धोका निर्माण झाला होता, परंतु कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असल्याने, संबंधित महिलेचा गर्भपात करण्यास रुग्णालयाने नकार दिला. त्यामुळे महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.