सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 27 जुलै 2024 (16:12 IST)

आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांना मुंबई पोलीस संरक्षण देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

आंतरधर्मीय विवाहित जोडप्याला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले. महिला आणि पुरुषशी वैयक्तिकरित्या बोलल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. महिलेने स्वैच्छिकरित्या तीन मुलींचा वडील असलेला विवाहित व्यक्तीशी लग्न केले. 

या दाम्पत्याने दाखल याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली. न्यायालयाने म्हटले, याचिकाकर्त्यांना 24 तास आठवड्याचे सात ही दिवस दोन सशस्त्र रक्षक देण्यात यावे. हे 8 ऑगस्ट पर्यंत याचिका कर्त्यांसोबत राहतील. तसेच याचिकाकर्त्यांवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे आदेश अहमदाबादच्या नारोल पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणात पुरुष मुंबईचा रहिवासी आहे. तर महिले.ने मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न करण्यासाठी अहमदाबादातील तिचे घर सोडले. तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली असून भावाने महिलेवर घरातील दागिने आणि 50 हजार रुपये नेण्याचा आरोप केला आहे.  
या वर महिलेने सांगितले, की 15 जुलै रोजी घरातून निघाली तेव्हा तिने काहीही चोरले नाही. तिने आईवडिलांकडे परत येण्यासाठी नकार दिला. 

महिला गेल्या सहा महिन्यापासून त्या पुरुषाला ओळखत होती. तो तिच्या मामाच्या फर्म मध्ये भागीदार होता. तिला तो विवाहित असून तीन मुलींचा वडील असल्याची माहिती होती. तरीही तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाला याचिकाकर्ता आणि तिच्या पालकात वैर असल्याचे खंडपीठाच्या निर्देशनात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी खंडपीठाने मुंबई पोलिसांना तात्काळ या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देष दिले. 
 
Edited By- Priya Dixit